विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था व रिवॉर्ड्स संस्थेचा संयुक्त उपक्रम
नागभीड
. विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर व रिवार्डस नागभीड नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांच्या प्रतिनिधींची निसर्ग संसाधने व्यवस्थापन व उपजीविका यावर क्षमता बांधणी कार्यशाळा पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे दि. 5 व 6 जानेवारीला संपन्न झाली. या कार्यशाळेत सिंदेवाही तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे 55 प्रतिनिधी सहभागी झाले होते.
. विदर्भातील वनावर अवलंबून असलेल्या समुदायास संघटित करून परिणामकरक धोरणे व विपणन याद्वारे वन उपजेतून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करणे या उद्धेशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी अक्षय सुकरे, रिवॉर्ड्स संस्थेचे अध्यक्ष गुणवंत वैद्य, ग्रामसभा महासंघ नागभीड चे अध्यक्ष कैलास नन्नावरे, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर चे प्रकल्प समन्वयक दिलीप नवघरे, तालुका समन्वयक सामूहिक वनहक्क रजनी घुगरे, रिवॉर्ड्स संस्थेचे समन्वयक भोजराज नवघडे यांनी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
. सिंदेवाही तालुक्यातील सामूहिक वनहक्क मिळालेल्या ग्रामसभांनी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती स्थापन करणे व वनहक्काची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ग्रामसभांनी वृषारोपण, रोपवाटिका, मृदा व जल संधारण, वनाचे पुनर्निर्माण इत्यादी कामे करावी, तेंडुपत्ता सारखे गौण वन उपाजाचे संकलन, वापर व विक्री करून लोकांची उपजीविका सुरक्षित करावी याबाबत सखोल मार्गदर्शन तज्ञ व्यक्तीद्वारे यावेळी उपस्थितांना करण्यात आले.
. या कार्यशाळेत संचालन भोजराज नवघडे यांनी केले तर आभार प्रफुल मसराम यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी रिवॉर्ड्स संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.