शिवसेना (उबाठा ) पक्षात वायगाव (ख ), वायगाव (भो.) येथील शेकडो महिला पुरुषांचा पक्षप्रवेश

67
  • शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

वरोरा

..                   शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संर्पक प्रमुख नेते आमदार भास्करजी जाधव साहेब यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता, शिवसेना प्रा. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार, 75-वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांचे नेतृत्वात तसेच चंद्रपूर जिल्हा संघटीका महीला आघाडी नर्मदाताई बोरेकर यांचे पुढाकाराने वायगाव (खडतकर) आणि वायगाव (भो.) येथील असंख्य पुरूष व महिलांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश केला.

.           शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख पदी रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांची नियुक्ती झाल्यापासुन पक्षात नवचैतन्य संचारले आहेत. तसेच ते ज्येष्ठ व युवा शिव सैनिकांना सोबत घेवून त्यांचे कार्य करीत असल्याने सर्वाना पक्षात कार्य करण्याची संधी मिळत असते त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन असंख्य शिवसैनिक पक्षात पक्षप्रवेश घेतांना दिसत आहे. हिन्दुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकृत केलेले 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे रविंद्र शिंदे यांनीसुध्दा अंगिकारले असल्यामुळे आणि ते व पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे जनतेचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढत आहे.

.              त्याच अनुषंगाने आज दि. 10/01/2023 रोज बुधवारला रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन वायगाव (खडतकर) आणि वायगाव (भो.) येथील सचिन जांभुळे, अमोल मन्ने, बंटी जांभुळे, राजकुमार कुबडे, कैलास जांभुळे, किसन मेश्राम, संजय जांभुळे, विलास जांभुळे, हनुमान मेश्राम, खुशाल मेश्राम, विठ्ठल भोयर, विकास मन्ने, विनोद मन्ने, गजानन जांभुळे, रमेश जांभुळे, शंकर भोयर, विकास जांभुळे, मंगेश मेश्राम, मारोती जांभुळे, सुरेश कामडी, राजु भोयर, संजय जांभुळे, स्वप्नील जांभुळे, शंकर भोयर, जितु कापटे, राजु जांभुळे, लिला मेश्राम, प्रतिभा जांभुळे, सोनु भोयर, कविता जांभुळे, वैशाली जांभुळे, वंदना जांभुळे, मंगळा जांभुळे, पोर्णीमा जांभुळे, वनिता जांभुळे, पायल गोहणे, सोनु जांभुळे, इंदिराबाई गोहणे, मंदाबाई मन्ने, आशाबाई ठाकरे, बकाबाई बावणे, देवता ठाकरे, संगिता मन्ने, सुंदराबाई जांभुळे, वर्षा मन्ने, निर्मला जांभुळे, हिराबाई कामडी, सोनाली गोहणे, रत्नमाला जांभुळे, रेवती भोयर, सुनंदा मेश्राम, कगु बावणे, सोनु मन्ने, शामकलाबाई जांभुळे व इतर अनेक पुरूष व महिला शिवसैनिकांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.

.             याप्रसंगी शिवसेना विधानसभा प्रमुख, 75 वरोरा विधानसभा क्षेत्र रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, , शिवसेना तालुका प्रमुख, वरोरा दत्ताभाऊ बोरेकर,, विभाग प्रमुख बोर्डा-शेगाव जि.प.क्षेत्र, चंद्रशेखर कापटे, शिवसेना शेगाव शहर प्रमुख प्रमुख, गजाननजी ठाकरे, अनिल सिंग, शिवसेना उपशहर प्रमुख, वरोरा, पवन महाडीक, शिवसेना ट्रान्सपोर्ट युनियन वरोरा, विजय नन्नावरे, सरपंच ग्रा.प.वायगाव, शंकर भोयर, पोलीस पाटील वायगाव ख., विजयजी गाठले, अर्चनाताई कामडी, अध्यक्षा यशोधन फाऊडेशन, चंद्रपूर, निलिमा आडे, पोलीस पाटील वायगाव भो., सुनंदाताई मन्ने, ग्रामपचायत सदस्य सचिन भोयर, राजु भोयर, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.