रासेयो शिबिरात विद्यार्थ्यांना सायबर क्राईम ची माहिती

38

 तुमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर 

वरोरा

.         आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन च्या वतीने तुमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला चंद्रपूर येथील पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाते यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना सायबर क्राईम या विषयावर माहिती देण्यात आली.

.         यावेळी विद्यार्थ्यांना माहिती देतांना . इरपाते यांनी मी कसा घडलो या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या शिबिराचा माध्यमातून गावातील रस्ते, नाल्या, शोष खड्डे व तलाव खोलीकरण ही कामे होणार आहे. या शिबिराची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमा द्वारे होणार आहे.