पोलिसांचा भोंगा चोरांना सावध करण्यासाठी की नागरिकांची झोप उडविण्यासाठी ?

52

नागभीड

.           चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागभीड पोलीस रात्री पोलीस वाहणातून गस्त करीत आहे. गस्तीवर असलेल्या वाहनाचा भोंगा लोकांना जागवतो की चोरांना सावध करतो यावर नागभीड शहरात चांगलीच खमंग चर्चा सुरु आहे.

.           नागभीड येथे नव्याने रुजु झालेले ठानेदार यांनी नागभीडात अफलातुन प्रयोग सुरु केला आहे. या प्रयोगाची नागभीडात खंमग अशी चर्चा सुरु आहे. नागभीड येथे राञोच्या वेळी पोलिस विभागाची गाडी गस्तीवर असते. त्यावेळी मोठ्याने भोंग्याचा आवाज येतो. या आवाजामुळे नागरीकांची झोप मोड होतेच पण लहान मुलांनाही याचा ञास होतो. या भोंग्या मुळे वयोवृद्ध नागरीकांनाही ञास होतो. काही नागरीकांचे म्हणने आहे की चोरांना सावध करण्यासाठी भोंग्या वाजविल्या जाते की जनतेला जागवण्यासाठी वाजविल्या जाते. हे पोलिसांनाच माहिती माञ या भोंगा मुळे अनेकांची झोपमोड होत असल्याची चर्चा आहे. लहान लहान मुलांनाही याचा ञास होत आहे. यावर पोलिस स्टेशन नागभीड यांनी तोडगा काढावा अशी नागरीकांची मागणी आहे.