विवेकानंद महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

31

भद्रावती

.         स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती समारंभाच्या निमित्ताने ८ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ ते १० जानेवारी हे तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिनांक ११ जानेवारी रोज गुरुवारला सकाळी १० वाजता “गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ” आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ, वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वझे व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.         दुसऱ्या दिवशी दिनांक १२ जानेवारी रोज शुक्रवारी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद जयंती व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान असणार आहे. यावेळी लोक शिक्षण संस्था वरोरा चे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रा.धनराज आस्वले ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तरी या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय टोंगे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगीता बांबोडे यांनी केले आहे.