चिमुरात राज्यस्तरीय भव्य खुल्या दौड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

42

बालाजी क्रिडा संकुल व भाजयुमो चिमूर चे आयोजन

आ. कीर्तिकुमार भांगडीया यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील निरज सोळंकी या धावपटूने प्रथम क्रमांक पटकविला

चिमुर

.          आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या हस्ते श्रीहरी बालाजी महाराज मंदिर, देवस्थान चिमूर येथे चिमूर क्रांती मॅराथॉन 2024 श्रीहरी बालाजी क्रिडा संकुल चिमूर व भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर द्वारा आयोजीत भव्य खुली दौड स्पर्धेला (10 कि.मी. मॅराथॉन पुरुष खुला गट) हिरवी झेंडी दाखवून सुरवात झाली. या दौड स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील एकूण ११३ धावपटूंनी सहभागी होत श्रीहरी बालाजी मंदिर ते पिंपळनेरी गावापर्यंत असे एकूण 10 की.मी. अंतर पूर्ण केले.

.          ही दौड स्पर्धा आटोपल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम थाटात संपन्न झाला. आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले व उपस्थित मान्यवरांसह दौड स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. सर्व विजेत्या धावपटूंना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मेडल्स, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. श्रीहरी बालाजी क्रीडा संकुलाच्या विविध विकासकामांसाठी एकूण ३५ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीहरी बालाजी क्रिडा संकुल व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांचा स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

.          स्पर्धेतील विजेते धावपटू निरज सोळंकी, भोपाळ (म.प्र.) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करीत 31001/- रुपये रोख (आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे कडून) पारितोषिक पटकाविले,