आ. प्रतिभा धानोरकर यांनी आगीत जळालेल्या घराला भेट घेऊन दिली आर्थिक मदत

41

चंद्रपूर

.           वरोरा तालुक्यातील वंधली येथील रामा झित्रू मडावी यांच्या घराला शॉट सर्किटने आग लागली. यामध्ये त्यांच्या घरातील २० क्विंटल कापूस तसेच घरातील इतर जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आज आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली.

.           याप्रसंगी काँग्रेस चे वरोरा तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, सरपंच प्रवीण भोयर, उपसरपंच अनिल ठावरी, ग्रामपंच्यायत सदस्य रुपाली धोटे, व गावकरी उपस्तित होते.

.           सोमवारी रात्री वरोरा तालुक्यातील वंधली येथील रामजी मडावी यांच्या घराला अचानक आग लागली. यावेळी घरातील २९ क्विंटल कापूस व इतर साहित्य असे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीवर नियंत्र आणण्याकरिता गावातील नागरिकांनी पाणी टाकून आग बुजविली. घटनांच्या पंचनामा अधिकाऱ्यांनी केला आहे. तात्काळ पीडित मडावी यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करून तात्काळ मदत मिळून देणार असल्याचे आश्वासन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले.