वरोरा येथे सांस्कृतिक सभागृह निर्माण करा : किशोर टोंगे

37

पालकमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांना मागणी

वरोरा

.           वरोरा येथील एकर्जूना येथे ग्रामस्थांच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमीचे भाकर हे नाटक आयोजित करण्यात आले होते. या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी किशोर टोंगे यांनी आपल्या उदघाट्नपर भाषणात जिल्ह्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आहे मात्र वरोरा शहरात सांस्कृतिक रंग मंदिर नाही ही खेदाची बाब आहे त्यामुळे वरोरा शहरात सांस्कृतिक रंग मंदिर उभारण्यात यावे अशी मागणी किशोर टोंगे यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना केली.

.           चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा हे सांस्कृतिक आणि सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे केंद्र आहे. शहरात विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातं असतात मात्र शहरात कुठलेही सभागृह नाही याविषयी खेद वाटतो. जिल्ह्यात यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री होऊन गेले तरीसुद्धा सांस्कृतिक सभागृह होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे. पुढे बोलताना टोंगे म्हणाले की कोणतीही काम करण्याची शैली, जिद्द,चिकाटी, असले की ते काम करण्यास कोणतीही अडचण निर्माण होत नाही मी यापूर्वी देखील त्यांना हा विषय निवेदनाद्वारे पोहचवला आहॆ. मात्र अजूनही याबाबतीत काहीही झालेले दिसत नाही त्यामुळे आतातरी सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन वरोरा शहर व परिसरातील लोकांना दर्ज्रेदार रंगमंदिर उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली.

.           यावेळी व्यासपीठावर माजी सभापती राजु गायकवाड, एकर्जुना चे सरपंच, नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर व आयोजक देविदास ताजने, इत्यादी उपस्थित होते.