सावित्रीच्या कर्तुत्वाची जान ठेऊन महिलांनी चळवळीत पुढाकार घ्यावा : सुरज खोब्रागडे

35

सिंदेवाही 

.           सावित्रीबाईंच्या तेजस्वी कर्तुत्वाचा आलेख हा प्रेरणादायी आणि काळाच्या पार्श्वभूमीवर अनुकरणीय ठरणारा आहे. त्यामुळे महिलांनी सावित्रीबाईंच्या कार्य कर्तुत्वाची जान ठेवून सामाजिक चळवळीत पुढाकार घ्यावा. आणि स्वतःसह इतरांचे जीवन प्रकाशमय करावे. असे मौलिक उदगार सामाजिक कार्यकर्ते सुरज गेंदबाजी खोब्रागडे यांनी कळमगाव येथील आयोजित सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवात व्यक्त केले.

.           ३ जानेवारी रोजी रमाबाई महिला मंडळ कळमगाव (गन्ना) येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सायंकाळी ४ वाजता गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे मार्गदर्शन पर मनोगत घेण्यात आले. नगर बौद्ध पंच कमिटी अध्यक्ष गेंदबा खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी पं.स. माजी उपसभापती बाबुराव गेडाम, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे, ग्राम पंचायत सरपंच मालता अगडे, उपसरपंच अविनाश नन्नावरे, सदस्य रेखा चौधरी, सुधाकर घरत , डॉ. तुळशीदास गेडाम, ह.भ. प. कमल गुळधे, पोलीस पाटील अल्का चौधरी, श्रावण मगरे, बळीराम ठीकरे, ऋषिदेव खोब्रागडे, रायभान मेश्राम, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

.            कार्यक्रमाचे संचालन कोमल गेडाम, तर सुरज खोब्रागडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात रमाबाई महिला मंडळाच्या सर्व महिलांनी तथा नगर बौद्ध पंच कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.