नंदोरी येथे कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण

182

भद्रावती

.          दुर्गा माता क्रिडा मंडळ नंदोरी च्या वतीने पुरूषांचे दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, नंदोरीचे ग्राम पंचायत सदस्य किशोर उमरे, महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष अशितोष घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

.          यात प्रथम पारितोषिक न्यु जगन्नाथ क्रिडा मंडळ कोंढा यांनी तर द्वितीय पारितोषिक दुर्गा माता क्रिडा नंदोरी नं 1 यांनी तर तृतीय पारितोषिक जय जगन्नाथ क्रिडा मंडळ कोंढा नं 2 आणि चतुर्थ पारितोषिक समस्त क्रिडा मंडळ पाटाळा यांनी प्राप्त केला आहे. सर्व विजेत्यांचा दुर्गा माता क्रिडा मंडळ नंदोरी च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

.          या प्रसंगी दुर्गा माता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशितोष घाटे, उपाध्यक्ष दिपक देशमुख, सचिव भूषण झाडे, सहसचिव यश लांबट, कर्णधार, निखिल ढवस, आकाश मोंढे, सतिश लांबट, गुरुदेव हरणे, प्रशांत तिखट, सूरज हंसकर, गणेश लांबट, प्रफुल ठेंगणे, सौरभ हरभडे, पवन निसाद, अमोल जिवतोडे, अनुराग वाढई, सागर राजुरकर, राहुल शिवरकर, प्रणय शिवरकर, विकास गुडधे, सूरज थेरे, साहिल ताजने, विष्णु रडके, नयन नैताम, ईशांत निसाद, गौरव झाडे, जगन झाडे, आर्यन रडके, रितीक ताजने, प्रणय झाडे, समिर ढवस, प्रणय कुरेकार, प्रज्वल वघदरकर, प्रशांत अहिरकर यासह सर्व क्रीडा मंडळाचे सदस्य, समस्त गावकरी उपस्थित होते.