कान्सा (सि.) येथील मोफत आरोग्य शिबीरात ४९७ रुग्णांनी घेतला लाभ

34

  रविंद्र शिंदे यांच्या हस्ते वंदनिय तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा जागेचे भुमीपुजन  

भद्रावती 

.           तालुक्यातील कान्सा (सि.) येथे श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत २६ डिसेंबर रोजी श्रध्देय बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त दि.२९ ला गावातील ग्रा. पं. पटांगणावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुदेव सेवा मंडळ कान्सा (सि.) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. तसेच ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त तथा शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते वंदनिय तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा जागेचे भुमीपुजन संपन्न झाले.

.           यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन शिबीराचे रितसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा प्रमुख तसेच ट्रस्टचे विश्वस्त रविंद्र शिंदे यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, सामाजिक कार्यकर्ते गणेश घोडमारे, सभापती भास्कर ताजणे, सरपंच मयुर टोंगे, पोलीस पाटील दिपक कुंभारे, माजी नगरसेवक नरेन्द्र पढाल, रोहन कुटेमाटे, विकास मत्ते, हरीभाऊ रोडे, नामदेव टोंगे, डॉ. नंदकिशोर रोडे, तसेच निखील मत्ते, पुरुषोत्तम चौधरी, शंकर रोडे, प्रफुल आसुटकर व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नंदोरी ग्रा.प.चे सरपंच मंगेश भोयर यांनी केले.

.           ट्रस्टचे उपक्रम विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम योजनेअंतर्गत वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा भेट देण्यात आला असुन मुर्ती प्राणप्रतिष्ठा जागेचे भुमीपुजन रविंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

.           आरोग्य शिबीरात सर्व रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधी वितरीत करण्यात आली. आरोग्य शिबीरास शिबीर प्रमुख डॉ. शशांक गोतरकर, अस्थीरोग तज्ञ डॉ. विवेक जडावाला, नेत्ररोग तज्ञ डॉ. स्वेता अलोणे व डॉक्टर चमु तसेच रुग्णालयाचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते मुर्लीधर उमाटे, सचिन आगलावे, अभिषेक टिकले यांनी अति मोलाची सेवा प्रदान केली. आरोग्य शिबीरामध्ये एकुण ४९७ नागरीकांनी नोंदणी करुन लाभ घेतला. या शिबीराचा आजूबाजुच्या गावातील जनतेनी लाभ घेत उस्फुर्त सहभाग नोंदवीला. प्रामुख्याने संत लहरीबाबा अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील ११४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिबीराचा लाभ मिळाल्याबद्दल उपस्थित आश्रम शाळेचे मुख्याध्यापक महेश काकडे, अधिक्षक पायल जिवतोडे तसेच शिक्षक धिरज मजगवळी यांनी ट्रस्टचे आभार व्यक्त केले.

.           आरोग्य शिबीरात एकुण नोंद रुग्णापैकी दुर्धर आजार असलेल्या ४९ रुग्णांना पुढील उपचाराकरीता आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी, वर्धा येथे ट्रस्टमार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती रविंद्र शिंदे यांनी दिली. सावंगी रुग्णालयात पुढील उपचाराकरीता येणारा खर्च हा ट्रस्टकडे तसेच हॉस्पीटलमध्ये जाण्याकरीता वाहनांची व्यवस्था मोफत राहणार, असे ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी यावेळी सांगीतले.