२५ वर्षा पेक्षा प्रदीर्घ काळापासून उभे असलेल्या झाडाची कत्तल

29

नागरिकांची सावली हरपली : ब्रम्हपुरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील झाडे

ब्रम्हपुरी

.          एकीकडे झाडे लावा झाडे जगवा यासाठी शासनाकडून दर वर्षी लाखो करोडो रुपये खर्च करीत असतो. तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली खुद्द प्रशासन आणि अधिकारी मुख संमत्ती देऊन २५ वर्षाहून जुनी झाडांची खुले आम कत्तल केल्याचा प्रकार ब्रम्हपुरी तहसील कार्यालय परिसरात घडला.

.          ब्रिटिश कालीन तहसील कार्यालयाची इमारत पाडून लोकांच्या सोईसाठी तहसील कार्यालयाची मोठी इमारत तयार करण्यात आली. त्या इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वारा समोरील परिसरात २५ वर्षाहून जुने विविध प्रजातीचे झाडे होती.त्या झाडाच्या सावलीत ग्रामीण भागातील कामानिमित्त आलेले लोक विसावा घेत होती. मात्र काल रात्री च्या सुमारास कोणतेही कायदेशीर शासकीय कारवाई न करता परस्पर तोंडी आदेश देऊन मोठ मोठ्या झाडाची कत्तल करून ती झाडाची परस्पर विल्लेवाट लावल्या गेल्याचे दिसते. विकासाच्या किंवा इमारतीच्या सुशोभीकरणासाठी झाडे तोडली असली तरी त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाचे लेखी आदेश घेणे त्या तोडलेल्या झाडाचा कायदेशीर लिलाव प्रक्रिया करने आवश्यक होते. जेणेकरून शासनाची संपत्ती ची रक्कम शासन तिजोरीत गेली असती.

.          मात्र तसे न करता कोणतीच परवानगी न घेता तोंडी आदेशाचे पालन करीत आपल्या जवळच्या ठेकेदारास झाडे तोडण्याची परवानगी देऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे बोलले जाते. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. पारडवार यांनी आवाज उचलला असता त्यांनी तहसीलदार, मुख्याधिकारी यांना सादर घटनेची माहिती फोन द्वारे दिली असता त्यांच्या कडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. डॉ.पारडवार यांनी वृक्ष संवर्धन अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना फोन वरून माहिती दिली असता त्यांनी घटना स्थळी येण्याचे औचित्य दाखवले नाही आपल्याच काही कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले त्या कर्मचाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी केली मात्र कोणती कारवाई केली हे गुलदस्त्यात आहे. थातूरमातूर चौकशी करून निघून गेले. वरील सर्व प्रकार काही सुज्ञ नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते. कोणतीही परवानगी न घेता मोठ मोठ्या झाडाची कत्तल करण्याचे तोंडी आदेश देणारे कोण याबाबत अनभिज्ञ असून एकीकडे झाडे लावा झाडे जगवा यासाठी तेच प्रशासन शासन करोडो रुपयांचा निधी खर्च करीत असते तर दुसरीकडे प्रशासन विकासाच्या नावाखाली २५वर्षाहून जास्त विविध प्रजातीचे मोठ मोठ्या झाडाची कत्तल केली जाते. याबाबत वृक्ष प्रेमी आश्चर्य व्यक्त करीत आहेत तर झाडे तोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वृक्ष प्रेमी करीत आहेत. तर लाखो रुपयाच्या तोडलेला लाकडाचे परस्पर विल्हेवाट लावले हे लाकूड जप्त करून लिलाव करणार काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.