५१ हजार महामृत्युंजय मंत्र लिहित वरोर्‍याच्या गायत्रीने रेखाटले उद्योगपती रतन टाटा यांचे चित्र 

94

अनोख्या शुभेच्छा देणाऱ्या गायत्रीचे सर्वत्र कौतुक 

वरोरा

.                उद्योगपती रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्य वरोर्‍यातील गायत्री खोके या मुलींनी ५१ हजार महामृत्युंजय मंत्र लिहित सात फुट उंचीचे चित्र रेखाटत रतन टाटा यांना त्यांच्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

.             गायत्री खोके हिने या आधी महाराष्ट्रातील विविध संतांचे चित्र रेखाटले आहे. तर उद्योगपती रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्य ७ फुट उंचीचे चित्र रेखाटत त्यात ५१ हजार महामृत्युंजय मंत्र आणी जय हिंद जय भारत असे लिहिले आहे. या मंत्रामध्ये एकूण ३३ शब्द आहे म्हणजेच १६ लाख ८३ हजार शब्द लिहिले आहे. ही पेंटिंग त्यांच्या वाढदिवसानिमित्य तयार केली आहे. ते रेखाटलेले चित्र गायत्री ही रतन टाटा यांची भेट घेऊन त्याना देऊ असे प्रसार माध्यमाशी बोलताना तीने सांगितले आहे. ती पेंटिंग सर्वांचे लक्ष आकर्षित करणारी आहे. वरोरा तालुक्यात या काढलेल्या पेंटिंग ची चर्चा होत आहे.