वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

38

 वडसी वाघेडा मार्गावरील शेतातील घटना 

नेरी

. शेतात चरत असलेल्या बैलावर एका पट्टेदार वाघाने हल्ला करून जागेवरच ठार केल्याची घटना नेरीवरून जवळ असलेल्या वडसी वाघेडा मार्गावरील रिसॉर्ट जवळ दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.

. वडसी येथील शेतकरी धनराज शिवदास मेश्राम यांच्या मालकीचा बैल सकाळी शेतात असताना दबा धरून असलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे वृत्त लिहिपर्यत बैलाचा पंचनामा व्हायचा होता. या परिसरात वाघाचा नेहमीच वावर असल्याने नागरिकांत व शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. तेव्हा वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.