भद्रावती येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 55 व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

28

भद्रावती 

. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक 29 ते 31 डिसेंबर ला आयोजित केला असून या दरम्यान विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव स्थानिक लोकमान्य विद्यालय भद्रावतीचे प्रांगणात संपन्न होत आहे.

. दि 29 डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी 5.30 वाजता शेषानंद पांडे महाराज यांचे हस्ते श्रीगुरुदेव अधिष्ठानाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल, यानंतर सायं. 5.30 वाजता सामुदायिक प्रार्थना होईल, याप्रसंगी रुपलाल कावळे वरोरा यांचे मार्गदर्शन होणार असून सायं.ठीक 7.00 वाजता राष्ट्रसंतांची खंजेडी भजन व यानंतर 8  वाजता चेतन ठाकरे व संच आरमोरी यांचा पंचरंगी विनोदी भारुडाचा कार्यक्रम होईल. तर 30 डिसेंबर रोज शनिवारला सकाळी 9 वाजता अरविंद राठोड , गुरुकुंज आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांची परिसंवाद स्पर्धा संपन्न होईल या स्पर्धेकरिता प्रमुख अतिथी म्हणून गोपाल कडू ,संकेत काळे महाराज उपस्थित राहतील, दुपारी 1 वाजता महिला संमेलन बेबी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून याप्रसंगी ह.भ.प. कविता चांदेकर ,नांदगाव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल,महिला संमेलन प्रसंगी निर्मला खडतकर, कविता येनुरकर, साक्षी पवार, संध्या विरमलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

. याप्रसंगी गरीब व गरजू व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता सामुदायिक प्रार्थना होईल या प्रसंगी मनोज महाराज चौबे चिंतन प्रकट करतील. सायं.7.45 ला राज घुमणार यांची व्याख्यानमाला होईल,  8 वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकज पाल महाराज व संच, वाशिम यांचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम होईल. 31 डिसेंबर रोज रविवारला सकाळी 7 रामधून निघेल व याप्रसंगी रवींद्र ढवळे यांचे मार्गदर्शन होईल, दुपारी 12 वाजता व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प. मधुकर खोडे (खराटे) महाराज यांचा कीर्तन व गोपालकाला कार्यक्रम संपन्न होनार असून गोपालकाला प्रसंगी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी गुरुकुंज आश्रम, लक्ष्मण गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी, वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग चे अध्यक्ष हंसराज अहिर, पोलीस अधिक्षक चंद्रपूर रविंद्र परदेशी, सेवकराम मिलमिले पंढरपूर यांचे मार्गदर्शन होईल. याप्रसंगी मंडळाचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली, तसेच सेवा गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. सायं. सामुदायिक प्रार्थना प्रसंगी प्रा.अशोक चरडे चिमुर चिंतन प्रगट करतील, यानंतर 8.30 वाजता झी मराठी, सोनी मराठी, कलर्स मराठी फेम युवा शाहीर रामानंद उगले व संच जालना यांचा महाराष्ट्राची लोकगाणी व पोवाडा या सुप्रसिद्ध कार्यक्रमांनी महोत्सवाची सांगता होईल.

. पुण्यतिथी महोत्सवातील सामाजिक उपक्रमामध्ये 30 डिसेंबर 2023 ला रात्री 8 वाजता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ नागपूरचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. मनीष माथनकर यांचे कर्करोग प्रतिबंध लक्षणे, उपचार संबधाने सरकारी योजनेची माहिती यावर मार्गदर्शन होणार आहे तसेच राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या सर्व कार्यक्रमाचा व उपक्रमाचा सर्व जनतेनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे वतीने करण्यात येत आहे.