गोंडी धर्मीय आदिवासी संघटनेतर्फे पत्रकार सुनील बिपटे यांचा सत्कार

41

भद्रावती 

.         भद्रावती येथील गोंडीधर्मीय आदिवासी बहुउद्देशीय संघटनेतर्फे येथील नागमंदिर जवळील जिल्हा परिषद हायस्कूल येथे संपूर्ण आदिवासी वीर वीरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

.         या सोहळ्याच्या कार्यक्रमात पत्रकारितेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करून सहकार्य करणारे भद्रावती येथील दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार सुनील बिपटे व विनायक येसेकर यांचा तेलंगणा राज्याचे गोंडी गायक रवी मेश्राम व गोंडी धर्मीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ, शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह  देऊन सत्कार करण्यात आला.

.         यावेळी संघटनेचे संदीप कुंमरे, गोलू गेडाम, अड प्रमोद गेडाम, पिंटू मडावी, महादेव महरसकोल्हे, विनोद शेडमाके आदी मान्यवर मंडळीची मंचावर उपस्थिती होती.