नेरी जाभुळघाट  मार्गावर “द बर्निग कार’

47

धावत्या ओमनी गाडीला अचानक लागली आग 

पत्रकार प्रवीण वाघेच्या सतर्कतेने वाचले तीन जणांचे प्राण

नेरी

.         नवरगाव येथील कार्यक्रम आटपुन नागपूर कडे जात असताना रामपूर गावाजवळ धावत्या ओमनी गाडीने अचानक पेट घेतला. दरम्यान याच मार्गाने पत्रकार प्रवीण वाघे हे येत होते. ही घटना त्यांच्या लक्षात येताच तात्काळ वाहनातील दोन महिला व चालकाला बाहेर काढले. काही क्षणातच संपूर्ण वाहन जळून खाक झाले. ही घटना चिमूर तालुक्यातील नेरी जाभुळघाट मार्गावर रामपूर जवळ दि 25 ला रात्री ९.३०  वाजता घडली.

.         सविस्तर माहिती अशी की नागपूर येथील एक कुटुंब  धम्म मेळावा या कार्यक्रमासाठी सिंदेवाही तालुक्यातील नवरगावला गेले होते कार्यक्रम आटपून परत नेरी जाभुळघाट मार्गाने नागपुर कडे जात असताना नेरी समोर 3 किमी पुढे रामपूर जवळ अचानक त्यांच्या ओमनी  एम एच 49 ए ई 4397 या क्रमांकाच्या वाहनाला आग लागली. त्याच मार्गाने  पत्रकार प्रवीण वाघे हे नागपूर वरुन नेरीला येत असताना रस्त्यात आगीत वाहन जळताना दिसले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वाहनजवळ जाऊन पाहिले असता वाहन पेटत असून तीन प्रवाशी बसले असल्याचे पाहिले तात्काळ कार्यकुशलतेने दोन महिला व एका पुरुषांला बाहेर काढले. आणि त्यांचे जीव वाचविण्यात यश मिळविले.

.         यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन ला माहिती दिली माहिती मिळताच चिमूर पोलीस दाखल झाले. अग्निशमन दलाला माहिती देताच आग विजविण्यासाठी तात्काळ गाडी दाखल झाली. आग विजविण्यात आली. मात्र वाहन जळून अवशेष उरले होते आग कशाने लागली याचे कारण कळू शकले नाही याचे तपास चिमूर पोलीस करीत आहे. मात्र प्रवीण वाघेच्या कार्यकुशलतेने तीन जणांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या कार्याचे गौरव होत असून सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात असून अभिनंदन केले जात आहे.