आंदोलक शेतकरी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

40

 रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन 

चंद्रपूर

.          वरोरा तालुक्यातील पाजरेपार रीठ ते आबमक्ता या रस्त्यासाठी तेथील शेतकरी २५ वर्षांपासून सतत मागणी करत आहे आणि त्यामुळे सन २०२० पासुन सातत्याने भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर – वरोरा तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम पाठपुरावा करत आहे, वरोरा तहसीलदार, वरोरा सार्वजनिक बांधकाम विभाग, वरोरा आमदार, चंद्रपूर जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, सर्वाना सातत्याने पाजरेपार रीठ ते आबमक्ता या रस्त्याला ( वि.आर ) नबंर व रस्त्याला मंजुरी करीता मागणी करत आहे.

.          तरीसुद्धा दुर्लक्ष करण्यात येत आहे, त्यामुळे दिनांक ०७/१२/२०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन येथे विकास खरगे मुख्यमंत्री यांचे प्रंधान यांना निवेदन सादर करण्यात आले होते,त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मागणी पुर्ण करा असे निर्देश दिले होते परंतु जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा यांनी उडवते उत्तर देत शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे दिनांक १९/१२/२०२३ पासून पाजरेपार रीठ ते आबमक्ता या रस्त्याला वि.आर नबंर व रस्त्याला मंजुरी देण्यात यावी करीता (बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर) नावाचे धरणे आंदोलन सुरू आहे आणि शासन दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे शेतकरी तीव्र होऊन आता ” कुठले भाडखाऊ शासन दारी ” असे बोलुन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा निषेध करुन पुतळा जाळून आंदोलनस्थळी बोलु लागले, कारण शेतकऱ्यांना रस्त्याच्या मागणी करीता आंदोलन करुन मागणी करावी लागत असणार तर कुठलं शासन आपल्या दारी असा प्रश्न गिरोला, आबमक्ता, येरखेडा, माकोणा, पाजरेपार रीठ, शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे आता भिम आर्मी संविधान रक्षक दल वरोरा तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांची मागणी आहे की पाजरेपार रीठ ते आबमक्ता या रस्त्याला ( वि.आर ) नबंर देऊन रस्ता मंजुरी देण्यात यावा अन्यथा आंदोलन तीव्र होत जाणार असा इशारा शेतकऱ्यांचा कैवारी जगदीश मेश्राम यांनी आंदोलनातुन दिला.