चंदनखेडा उपबाजार आवार येथे वजनकाटा सुरू होणार 

39

रविंद्र शिंदे यांच्या हस्ते भुमिपुजन 

भद्रावती 

.          शिवसेना ( उबाठा) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या आर्थीक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच योजनांतर्गत आज भारतीय शेतकरी दिनाच्या शुभ पर्वावर बाजार समितीच्या उपबाजार चंदनखेडा येथे शिवसेना ( उ. बा. ठा. ) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते तसेच कृ.. उ. बा.स. सभापती भास्कर ताजने व उपसभापती अश्लेषा भोयर ( जिवतोडे ) यांच्या प्रमुख उपस्थितीत  वजनकाटा पायाभरणी बांधकामाचे  भुमिपुजन  करण्यात आले.

.          यावेळी कृ. उ. बा.स. चे संचालक गजानन उताने, ज्ञानेश्वर डुकरे, भानुदास गायकवाड, शरद जांभुळकर, श्याम कापटे, कान्होबा  तिखट, मनोहर आगलावे, परमेश्वर ताजने, शांता रासेकर, मोहन भुक्या आणि अतुल जिवतोडे, यांच्यासह माजी नगरसेवक नरेंद्र  पढाल, राहुल मालेकर, सरपंच बंडू  नन्नावरे, विठ्ठल हनवते, शिवदूत बंडू  निखाते, विलास पडवे, माजी नगरसेवक मनिष सारडा, तंटामुक्ती समिती  अध्यक्ष मनोहर हनवते, शिवसैनिक शाहरुख पठान, मुर्लीधर टोंगे, प्रमोद खिरटकर आणि   बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर उपस्थित होते.

शेतकरी बांधवांचे आर्थिक बळ वाढविण्यास सदैव तत्पर : रविंद्र शिंदे                                                                                                                                                                                                                                                                                                                                               वरोरा -भद्रावती  विधानसभा क्षेत्रात पक्षाचे पुर्व विदर्भ संपर्क नेते आ. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनात पक्षबंधणीसह जनकल्याणाची विविध कार्य सर्वांच्या सहकार्याने अत्यंत जोमाने सुरू आहे. या विधान सभा क्षेत्रातील शेतकरी बांधवांना न्याय मिळावा. त्यांच्या शेती उत्पादनात भर पडावी. त्यांच्या शेतमालाची उचित भावाने आणि योग्य प्रकारे विक्री व्हावी. यासाठी भद्रावती कृ. उ. बा.स. च्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू आहे. चंदनखेडा येथील उपबाजारात शेत पिंकाची विक्री करतांना शेतकरी बांधवांना अडचणी येऊ नये .यासाठी या उपबाजारात वजनकाटयांची लवकरच सुरूवात होत असून. या सुविधेचा लाभ परीसरातील शेतकरी बांधवांना होईल. यासाठीच  शेतकरी बांधवांचे आर्थिक बळ वाढविण्यास सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन  वरोरा -भद्रावती  विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे  यांनी याप्रसंगी केले.