अंत्यसंस्कारासाठी जात असलेले वाहन उलटले

42

1 गंभीर 2 जखमी : नेरी चिमूर मार्गावरील घटना

नेरी

.         अंत्यसंस्काराच्या  कार्यक्रमाला टाटा सुमो या वाहनाने जात असताना अचानक वाहनात बिघाड आल्याने वाहन उलटले यात 1 वृद्ध गंभीर तर 2 जण जखमी झाल्याची घटना . चिमूर नेरी मार्गावरील उमरे यांच्या पोल्ट्रीफॉम् जवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास  घडली.

.         शेगाव वरून नागभीड येथे नातेवाहिकाच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी १२ जण टाटा सुमो क्र. एम एच 26 एल 1637  ने जात असताना चिमूर नेरी मार्गावर अचानक वाहनात बिघाड आल्याने वाहन उलटले.  सदर घटनेची माहिती मिळताच दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या गाडीतील सर्व लोकांना उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यात दोन जन जखमी झाले तर एकवृद्ध गंभीर जखमी झाले सदर वृद्धाला नागपूर ला हलविल्याची माहिती मिळाली आहे मात्र जीवितहानी झाली नाही सदर घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.