नेरी येथे भव्य मोफत रोगनिदान व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर

26

नेरी

.        नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथी ब्रह्मपुरी, व्यापारी असोसिएशन नेरी, गुरुदेव सेवा मंडळ नेरी, व केमिस्ट असोसिएशन नेरी यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 24 डिसें रोज रविवारला सकाळी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे जुनाट व असाध्य अशा वारंवार होणाऱ्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांकरिता मोफत रोगनिदान व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर आयोजित केलेले आहे.

.        या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. श्यामसुंदर माने (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला), डॉ. माधुरी माने(स्त्रीरोगतज्ञ अकोला), डॉ. विशाल इखार (होमिओपॅथिक तज्ञा नागपूर), डॉ. पल्लवी राजुरकर (होमिओपॅथिक तज्ञ नागपूर ), डॉ. सुशांत पिसे (नॅचरोपॅथी व होमिओपॅथिक तज्ञ नागपूर), दादाराव पिसे (अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ नेरी), डॉ. श्याम हटवादे (अध्यक्ष नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथिक ब्रह्मपुरी), डॉ. विशाल गजापुरे (होमिओपॅथिक तज्ञ ब्रह्मपुरी), डॉ. प्रभुदास चिलबुले (माजी अध्यक्ष नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथिक ब्रह्मपुरी), डॉ. घनश्याम बिंझवे (माजी अध्यक्ष नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथिक ब्रह्मपुरी), मनोहर नागोराव पिसे (ज्येष्ठ फार्मसीसट नेरी), मंगेश चांदेकर (अध्यक्ष व्यापारीअसोसिएशन नेरी) यांच्या उपस्थितीतसंपन्न होत आहे.

.        या शिबिरात लहान मुलांपासून तर पौड व्यक्ति पर्यत तपासणी केली जाणार असून सर्वच प्रकारच्या आजारावर तपासणी केली जाणार आहे यात स्त्रिया च्या सर्वच रोगांवर व समस्यांवर सुद्धा तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त रुग्ण बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.श्याम हटवादे ,डॉ. प्रवीण झाडे, डॉ.प्रशांत शिवरकर, डॉ.जगदीश पिसे, डॉ. ऋतुजा निमजे, डॉ. मदनकर, डॉ. प्रणय कुंभारे तथा आयोजक यांनी केलेली आहे.