दोन दिवस उलटूनही मजुराचा मृतदेह आढळला नाही

25

शोध मोहीम सुरु : राखेच्या ढिगाऱ्यात अडकला मृतदेह व दुचाकी

जिल्हा आपत्ती विभाग हाकलतो उंटावरून शेळ्या

वरोरा

.          गिट्टी खदानीतील मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा राखेची दरळ कोसळ्याने राखे खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान नंदोरी खुर्द येथील जैन क्रेशर च्या खदानीत घडली. २० तासानंतर मुलाचा मृतदेह सापडला मात्र घटनेला २ दिवस उलटले तरी रामचंरण चा शोध लागला नाही. स्थानिक खदान मालकाकडून मृतदेह शोध मोहीम सुरु आहे तर जिल्हाचा जिल्हा आपत्ती विभाग उंटावरून शेळ्या हाकलतानी दिसून येत आहे.

.          नंदोरी खुर्द येथे मोठया प्रमाणात गिट्टी खदाणी व गिट्टी क्रेशर आहेत. या गिट्टी खदाणी वर काम करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील मजूर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यात आहेत. क्रेशरवरच मजुरी करने आणि तिथेच राहणे. अनेक जण आता महाराष्ट्रातील रहिवासी सुद्धा झाले आहे. रामचंरण जंघेल हा आपल्या पत्नीला घेऊन ३० वर्षांपूर्वी नंदोरी येथे कामाच्या शोधात आला. आणि सुरवाती पासूनच तो पंकज जैन यांच्या जैन मेटल या क्रेशर वर काम करू लागला इथेच त्यांचा संसार फुलला त्याला २ मुले व २ मुली झाल्या सर्वांचे लग्न झाले. मृतक योगेश हा रामचंरण चा दुसरा मुलगा. योगेश चे मागील वर्षीचं लग्न झाले होते. त्यांची पत्नी ८ महिन्याची गरोदर आहे. असे असताना अचानक योगेश च्या मृत्यूने त्या मातेवर फार मोठे संकट कोसळले आहे. या खदानीत राहणारे मजूर अजूनही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
. जिथे खदाणी तिथेच वास्तव अशी परिस्थिती असलेल्या या नंदोरी खुर्द येथे वास्तवात असलेल्या कुटुंबाना जीव मुठीत घेऊन राहावं लागत. खदानीतील गोटा काढण्यासाठी दररोज ब्लास्टिंग केल्या जाते. या ब्लास्टिंगचे हादरे तब्बल ५ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना बसतात तर तिथेच राहत असलेल्या नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल हे मात्र त्यांनाच ठाऊक.