नागभीड चे क्रीडा संकुल होणार सुसज्ज!

43
  • 25 कोटी च्या निधीला प्रशासकीय मान्यता
  • आ. बंटी भांगडिया यांचे विशेष प्रयत्न

नागभीड

.          तालुक्यात सुसज्ज असे क्रीडा संकुल तयार व्हावे व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सतरावरील स्पर्धेत  नागभीड तालुक्यातील खेळाडू यांनी  आपले यश प्राप्त करावे यासाठी शासन दरबारी सतत निधीची मागणी आमदार बंटी भांगडिया यांनी लावून धरली होती.  त्यांच्या या प्रयत्नाने शासनाने  25 कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यतेसह नागभीड क्रीडा संकुलाला घोषित केला आहे. यामुळे नागभीड चे क्रिडा संकुल आता सुसज्ज होणार आहे.

.          नागभीड तालुक्यातील अनेक खेळाडू  सरावा पासून वंचित राहत होते. सदर संकुला त व्हालिबॉल, बास्केटबाल, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, योगा हॉल, मीटिंग रूम, चेंजिंग रूम, जिमन्यास्टिक हॉल, धावपथ यासह विविध खेळाची मैदाने यांची उपलब्धता नसल्याने अनेक खेळाडू सरावापासून वंचित राहत होते..

.          सन 2022 मध्ये नागभीड येथे तालुका क्रिडा संकुल ला मान्यता मिळाली.  यांनतर 2013-14 या वर्षात शासनाकडून एक कोटी रुपयाचा तोकडा निधी मिळाला. त्यामुळे क्रीडा संकुलाचे बांधकाम योग्यरीतीने झाले नाही. सन 2019 नंतर आमदार बंटी भांगडिया यांच्या  माध्यमातून चार कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधीतून निधी  मिळाला. त्यातून सुसज्ज असे जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल बांधण्यात आले. मुख्य क्रीडा संकुला मध्ये एक इनडोअर बॅडमिंटन सभागृह व सहा एकर जागा असलेल्या क्रीडा संकुलाला संरक्षण भिंत बांधण्यात आली. अपुऱ्या क्रीडा संकुलाच्या कामामुळे नागभीड तालुक्यातील अनेक खेळाडू  सरावा पासून वंचित राहत होते. सदर संकुला दोनशे व्हालिबॉल, बास्केटबाल, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, योगा हॉल, मीटिंग रूम, चेंजिंग रूम, जिमन्यास्टिक हॉल, धावपथ यासह विविध खेळाची मैदाने यांची उपलब्धता नसल्याने अनेक खेळाडू सरावापासून वंचित राहत होते.

.          सदर निधीच्या माध्यमातून मीटिंग हॉल, इनडोअर हॉल चे उर्वरित काम, मैदान सपाटीकरण, पार्किंग शेड, चेंजिंग रूम, संरक्षण भिंत, गेट चे काम, जलतरण तलावाची उंची वाढविण्याचे काम, अंतर्गत रस्ते, विविध खेळाची मैदाने, बहुुद्देशिय कोर्ट, बास्केटबाल कोर्ट, ऑफिस फर्निचर, विद्युतिकरण, बोरवेल, मोटर पंप, सोलर सिस्टिम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडा साहित्य खरेदी इत्यादी कामे या निधीतून होत आहेत. सदर क्रीडा संकुलाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने आ. बंटी भांगडिया यांचे नागभीड क्रीडा विश्वातून आभार व्यक्त केले जात आहे. व क्रीडा प्रेमींमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.