भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे शिवसेनेच्या युवासेना युवा जिल्हाप्रमुख पदी नियुक्त

61
  • चंद्रपूरमधील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे जिल्हाप्रमुख पद जाहीर
  • पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे व नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नियुक्ती

भद्रावती (प्रतिनिधी) :

.                शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेना युवा अधिकारी (जिल्हाप्रमुख) पदावर भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे यांची नियुक्ती केली आहे.

.           शिवसेना युवा नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शीतल देवरुखकर-सेठ, युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे रोहन कुटेमाटे यांचे आभार मानले आहे.

.            हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पाईक होवून व समाजकारणाला प्राधान्य देवून राजकारण करावे, क्षेत्रात काम करीत असताना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रक्रम द्यावा, व शिवसेनेच्या विचारांना घराघरात पोहोचवावे, असे या नियुक्तीच्या निमित्ताने रविंद्र शिंदे यांनी म्हटले आहे.

.               युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे यांचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, चंदपूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख नर्मदा बोरेकर, उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजने, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर युवतीसेना, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, महीला आघाडी उपजिल्हाप्रमुख मायाताई नारळे, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा तालुका प्रमुख महिला आघाडी सौ. सरला मालोकार, भद्रावती तालुकाप्रमुख महीला आघाडी तथा युवतीसेना जिल्हा समन्वयक अश्लेषा जिवतोडे भोयर, भद्रावती शहर महीला आघाडी प्रमुख माया टेकाम, उपतालुका संघटिका शिला आगलावे, युवतीसेना उपजिल्हाधिकारी शिव गुडमल, युवासेना उपजिल्हा अधिकारी शरद पुरी, युवासेना जिल्हा समन्वयक येशु आरगी, युवा सेना विधानसभा अधिकारी अभिजित कुडे, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, विक्की तवाडे, भद्रावती तालुका युवती अधिकारी नेहा बनसोड, युवासेना शहर अधिकारी प्रज्वल जानवे, मनोज पापडे, माजरी शहर प्रमुख रवि राय, रवि भोगे, शेगाव (बु.) प्रमुख गजानन ठाकरे, व समस्त वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.  सदर प्रसिध्दी माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, प्रसिध्दी प्रमुख रवि कावळे, यांनी दिली आहे.