धनगर समाज एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय गप्प बसणार नाही – पुरुषोत्तम डाखोळे

50
  • यशवंतराव होळकर जयंती विशेष

वरोरा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, वरोरा च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम बोर्डा, वरोरा येथे महाराजा यशवंतराव होळकर याची जयंती साजरी करण्यात आली. व विशाल मोर्च्याच्या संदर्भात बैठक पार पाडली.

.                  या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जि. प. माजी अध्यक्ष व सकल धनगर समाज विशाल मोर्च्याचे आयोजक पुरुषोत्तम डाखोळे, धनगर युवक मंडळ अध्यक्ष रमेश पाटील, धनगर युवक मंडळ सचिव गणेशराव पावडे, अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे संजय बोधे, धनगर समाज संघर्ष समितीचे गजानन शेळके, अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम च्या संचालिका सोनूबाई येवले उपस्थित होते.

.                        यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराज यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी पाहुण्यांनी मार्गदर्शनात होळकर कुटुंबातील इतिहासाची आप बिती समजावून सांगितली. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक पुरुषोत्तम डाखोळे यांनी धनगर समाज एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्याच्या नेतृत्वात मोर्चा नाही तर सकल महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या नेतृत्वात ११ डिसेंबर २०२३ ला विधानभवनावर विशाल मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला चंद्रपूर जिल्यातील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

.                     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संचालन गणेश चिडे यांनी तर आभार आशिष मोंढे, शिरीष उगे यांनी मानले. व वरोरा तालुक्यातील बहुसंख्येनी धनगर समाज बांधव आणि भगिनीं उपस्थित होते.