शिवसेना चंद्रपूर तालुका व महानगर पालिका आढावा बैठक संपन्न

37

चंद्रपुर

.        शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय पईतवार व शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे सूचनेनुसार चंद्रपुर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आशिष ठेगणे (चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र) यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह ,चंद्रपूर येथे रविवारला शिवसेना चंद्रपूर तालुका व महानगर पालिका आढावा बैठक संपन्न झाली.

.        सदर बैठकीला शिवसेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, चंद्रपुर महानगर प्रमुख भरत गुप्ता, प्रतिमा ठाकुर, वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख अरविंद धीमान, तालुका संघटक संजय शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

.        चंद्रपूर तालुका व महानगर पालिका आढावा बैठकीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख चदपूर नितीन मत्ते यांनी दिलेल्या सूचना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष ठेंगणे यांनी कार्यकर्त्यांना देवून येणाऱ्या जि. प., पं. स. व महानगर पालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील. तसेच मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारद्वारे घेतलेल्या निर्णयाची माहिती आशिष ठेंगणे यांनी आढावा बैठकीमध्ये दिली. चंद्रपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रत्येक वार्ड, प्रभाग व सोसायटीच्या ठिकाणी शिवसेनेची शाखा निर्माण करून शाखा प्रमुख, बूथ प्रतिनिधी, व शिवदूत यांची नेमणूक करून पक्ष संघटन वाढवण्यासाठी विशेष भर द्यावा अशी जिल्हा प्रमुख नितीन मते यांनी दिलेली सूचना आशिष ठेंगणे यांनी बैठकीमध्ये विशद केली.

.        यावेळी उपतालुका प्रमुख सुरेश खापर्डे, अविनाश ऊके, गुरुदास मेश्राम, मुक्कद्दरसिंग बावरे, श्रेयांश ठाकूर, सुचक दखने, तरुण येनगटीवार, शैलेश सदलावार, रोशन वागदे, विश्वास खैरे, राजू ऐटलवार, राजू रायपुरे, अमोल टोंगे, संदिप तामटकर, वाण सदलावार, गिता गडपेल्लीवार आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.