क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन संपन्न

35

भद्रावती

.          यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष प्रा. कमलाकर हवाईकर, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, भीष्माचार्य बोरकूटे, प्रविन मत्ते, हरिहर मोहरकर व्यासपीठावर उपस्थित होते.

.          क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. कमलाकर हवाईकर यांनी “महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार प्रत्यक्षात कृती उतरवण्याची गरज असल्याचे व्यक्त केले ” तर प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी “स्त्री शिक्षणाचे प्रणेते, समाज सुधारक, समाजिक क्रांतीचे अग्रदूत, शिक्षणतज्ज्ञ , शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श जीवनात घेऊन विद्यार्थ्यांनी कार्यप्रवण झाले पाहिजे” असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यात निलेश कुळमेथे, मगरे, राजभर, जान्हवी सूर्यवंशी, श्रृतीका नागपुरे , संगेल, वाघ आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

.          कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता जक्कुलवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा दोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणिता बोकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रेमा पोटदूखे , माधव केंद्रे, मुक्तावरम व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.