पिपरहेटी येथे जनहित फाऊंडेशन कडून संविधान जनजागृती

42

        फाऊंडेशन ने केले आदिवासी समुदायाला उद्धेशिकेचे वितरण       

सिंदेवाही

.         स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षात दळणवळणाची सुविधा नसलेल्या आणि १०० टक्के आदिवासी समुदाय असलेल्या पिपरहेटी या गावात जनहित फाउंडेशन वासेरा मार्फत नुकतेच संविधान जनजागृती करून तेथील नागरिकांना संविधानाच्या उद्धेशीकेचे वितरण करण्यात आले.

.         सिंदेवाही तालुक्यातील गट ग्राम पंचायत असलेल्या मौजा पिपरहेटी या आदिवासी पाड्यात स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर सुद्धा कोणत्याही सोयी सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. तसेच तेथील नागरिकांना संविधान म्हणजे काय? त्यांची निर्मिती कधी आणि कोणी केली. याबाबत काहीच माहिती नसताना वासेरा येथील जनहित फाऊंडेशन यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला संविधान सन्मान सप्ताह च्या निमित्ताने पिपरहेटी येथे जावून संविधान जनजागृती हा कार्यक्रम घेण्यात आला.

.         यावेळी जनहित फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान काय आहे ? तुमचे हक्क तुम्हांला कोण प्रदान करते ? लोकशाहीचे महत्व,ग्रामसभेचे महत्व,मतदानाचा अधिकार,शिक्षणाचा अधिकार,मूलभूत अधिकार यावर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. पिपरहेटी सारख्या दुर्गम आणि जंगलव्याप्त गावात येऊन येथील नागरिकांना संविधानाचे महत्व तसेच शिक्षणाचे महत्व पटवून दिल्याने सरपंच मनीषा दादाजी गेडाम, तसेच पोलिस पाटील आत्राम यांनी जनहित फाऊंडेशन यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकाची प्रत वितरीत करून लोक सहभागातून सर्वांनी सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाला पिपरहेटी ग्रामवासियांनी उत्कृष्ठ असा सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले.

.         तसेच यावेळी जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, सचिव,तथागत कोवले, उपाध्यक्ष विशाल गेडाम, कोष्याध्यक्ष वीरेंद्र मेश्राम, सदस्य किशोर बोरकर, सत्यपाल मेश्राम, रितेश सूर्यवंशी, उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सनम मेश्राम, समीर कोवले, अजित खोब्रागडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन तथागत कोवले व आभार प्रदर्शन रितेश सूर्यवंशी यांनी केले.