विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन साजरा

37

भद्रावती

.          गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रविवार दि.२६ नोव्हेंबर, २०२३ ला महाविद्यालयाच्या श्री अरविंद सभागृहात सकाळी ०९.०० वाजता संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

.          याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नथ्थू वाळवे, सिनेटर सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा निळकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय भद्रावती, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उत्तम घोसरे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून आपल्याला लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी संविधानात दिलेल्या मानवी हक्क, अधिकार, कर्तव्य,नियम व कायद्याचे पालन करावे लागेल.

.          स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. डॉ. उत्तम घोसरे यांनी प्रास्ताविक व संविधान उद्देशिकेचे वाचन केले. प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून प्रत्येक मानवाचे कर्तव्य व जबाबदारी त्यानुसार अंमलबजावणी व्हावी असा संदेश दिला. संचालन प्रा. डॉ. रमेश पारेलवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. गजानन खामनकर यांनी केले. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योती राखुंडे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगीता बांबोडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश तितरे, डॉ. यशवंत घुमे, डॉ. मोहित सावे, प्रा. श्रीकांत दाते, सेवक, वामन अंड्रस्कर इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.