डॉ. आंबेडकर विद्यालय, ब्रह्मपुरी येथे संविधान दिन साजरा

47

ब्रम्हपुरी

.          डॉ.आंबेडकर विद्यालय,ब्रम्हपुरी येथे संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयांचे मुख्याध्यापक टी. जी चाचकर, पर्यवेक्षक व्ही. डब्ल्यू. ननावरे व ज्येष्ठ शिक्षिका ए.बी. शेळके यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व तसेच भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना पुष्यमाला व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.

.          याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. जी. चाचरकर यांनी आपल्या भाषणात आपला भारत देशात दरवर्षी संविधान हा दिवस सविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेचे अध्यक्षाची राज्यघटना स्वीकारली त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र संविधान दिन साजरा केला जातो. भारतातील विविध धर्म आणि जातीच्या 140 कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्य घटनेनेने बनलेली आहेत. या संविधानात अंतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ, पंतप्रधान, आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालय त्या अंतर्गत काम करतात शिवाय याच संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत. त्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो असे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थी तथा विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संविधानाचे वाचन करून गावात जनजागृती रॅली काढून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षिका व शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भरडकर यांनी केले