गडचांदुर येथे फिरते रूग्णसेवा केंद्रा चे लोकार्पण

34

 हंसराज अहिर यांचे विशेष प्रयत्न 

गडचांदुर

.           औद्योगिक नगरी गडचांदुर येथे हिंदुस्थान कॉर्पोरेशन तथा व्होकार्ड फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे विशेष सहकार्याने राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यासाठी फिरते रूग्णालय सेवा केंद्राचे लोकार्पण नुकतेच गडचांदुर येथे पार पडले.

.           राजुरा विधानसभा क्षेत्र हे दुर्गम क्षेत्र आहेत, ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग शेतातील काम सोडुन उपचारासाठी शहरात येणेसाठी तो धास्तावतो, अशा बांधवांनी या फिरते रूग्णालयाशी आपली नाळ जोडुन वैद्यकीय उपचार करून घ्यावे असे केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांनी उद्घाटनीय संबोधनात सुचविले. हिंदुस्थान कॉर्पोरेशन लिमिटेड चे उपमहाप्रबंधक मुकुंद जवंजाळ अध्यक्षिय भाषणात बोलतांना म्हणाले की, सामाजिक दायित्वाअंतर्गत आम्हाला येथिल जनतेला सेवा देण्यात आनंद वाटतो आहे.

.           यावेळी प्रमुख पाहुणे जितेश लांबिया व्होकार्ड फाउंडेशन मुंबई, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ कटाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल टेंभे, डॉ.गायकवाड यांचे सह गडचांदुर, राजुरा,जिवती तालुक्यातील बहुतांश मातृशक्ति,बांधव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश ताजणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतिश उपलेंचिवार यांनी मानले.