छठपूजा उत्सवासाठी शिरणा नदीतील घाटांची सफाई सुरु

486

 सफाई करिता रविशंकर राय यांनी दिले होते वेकोलिच्या उपमहाप्रबंधक यांना निवेदन 

माजरी 

.         माजरी – उत्तर भारतीयांचा सूर्य उपासनेचा मुख्य सण “छठपूजा” १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. यामध्ये उत्तर भारतीय लोक पूजेसाठी शिरणा नदी घाटावर पोहोचतात. हे पाहता वेकोलिच्या जेसीबी मशीनने गुरुवारी आणि शुक्रवारी शिरणा नदीच्या घाटांची स्वच्छता केली. त्यासाठी वेकोलि प्रशासनाने जेसीबी पाठविली आणि कंत्राटदार परवेज शेख यांनी त्यांचे पोनलेन मशीन दिले. दरम्यान पोकलेन मशीनद्वारे नदीचे खोलीकरण करून पाणी साठविण्यात आले.

.         दरम्यान माजरी परिसरात छ्ठपूजेसाठी शिरणा नदीतील घाटांची सफाई करण्यात यावा. अशी मागणी शिवसेना (उबाठा) माजरी शहरप्रमुख रविशंकर राय यांनी केली होती. या मागणी संदर्भात रविशंकर राय यांनी वेकोलि माजरी क्षेत्राचे उपमहाप्रबंधक आर. आरुमूगम यांना दि. ७ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर केले होते. माजरीतून वाहणाऱ्या शिरणा नदीच्या वेगवेगळ्या घाटावर उत्तर भारतीय श्रद्धालु दिवाळी नंतर होवू घातलेल्या छठपूजेत सूर्य देवताची उपासना करतात. या उत्सवात हजारोंच्या संख्येत महिला भगिनी नदी पात्रातील पाण्यात उभे राहून पूजाअर्चा करतात. उत्सवादरम्यान उत्तर भारतीय श्रद्धालुंची शिरणा नदी घाटावर मोठी गर्दी जमते. मात्र, नदी घाटावर झाडे झूडुपे तथा त्याठिकाणी श्रद्धालूंना उभे राहण्याची सोय नसल्याने सदर सण साजरा करण्यास अडचण निर्माण होवू नये यासाठी राय यांनी सफाईची मागणी केली होती. दरम्यान वेकोलि प्रशासनाने रविशंकर राय यांच्या निवेदनाची दखल घेत गुरुवारपासून शिरणा नदीतील घाटांची सफाई करण्याची सुरुवात केली.

छठघाटाच्या स्वच्छतेदरम्यान शिवसेना (उबाठा) माजरी शहर प्रमुख रविशंकर राय यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते छठ घाटावर पोहोचून व्यवस्था पाहिली. छठपूजेसाठी वेकोलि कडून करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल उत्तर भारतीय नागरिकांनी आभार व्यक्त केले.