चिकमारा येथे वर्षावास समापन निमित्त कार्यकारिणी गठित

39

सिंदेवाही

.            आषाढ पौर्णिमा पासून सुरू झालेला वर्षावास प्रवचन मालिका हा तीन महिन्याचा कार्यक्रम नुकत्याच झालेल्या अश्विन पौर्णिमेला संपला असून मौजा चिकामारा येथे वर्षावास प्रवचन मालीकेचे समाप्ती कार्यक्रम ग्राम शाखाचे वतीने आयोजित करण्यात आला.

.            रवीजी अलोणे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पूर्व डॉ राजपाल खोब्रागडे जिल्हा संघटक डॉ रविंद्र शेंडे, तालुका सरचिटणीस प्रा. जगदीश सेमस्कर , तालुका उपाध्यक्ष अंबादास कोसे, प्रचार पर्यटन सुरेश गोर्वधन मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करून बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर सतत तीन महिने सुरू असलेल्या वर्षावासाचे महत्व काय आहे? या तीन महिन्यात संघ कुठे असतो, कोणता प्रसार आणि प्रचार करतो. याबाबत उपस्थितांनी सविस्तर मार्गदर्शन केले. व त्यानंतर चीकमारा ग्राम शाखा गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अश्विनी किशोर लोनारे, सरचिटणीस अनामिका देवानंद दरडमारे, कोषाध्यक्ष निळकंठ कपिल अलोणे, मिनाक्षी अरविंद अलोणे, भावणाताई सुरेश गोर्वधन, भुमिकाताई अलोणे, चंद्रशेखर अलोणे, रोशन लोणारे, अंशुताई अलोणे, इदुताई गोवर्धन, प्रियंका अलोणे, दिपिका खोब्रागडे, योगीता गेडाम, आकाश खोब्रागडे, कांबळे यांची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमाचे शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक उपाशिका उपस्थित होते.