शिधापत्रिकाधारकांच्या घरात दिवाळी सणाचा गोडवा

33

सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीचा उपक्रम :  विसापुरात ‘ आनंदाचा शिधा ‘ किटचे वितरण सुरु

चंद्रपूर

.           शासनाच्या अन्न पुरवठा नागरी विभागाच्या वतीने अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या सिद्धपत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा ‘ योजनेच्या माध्यमातून १00 रुपयात शिधा जिन्नस वितरण करण्यात येत आहे. याचा शुभारंभ शुक्रवार दि. १0 रोजी विसापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार परमेश्वर पुणेकर यांच्या दुकानातून करण्यात आला.याचा लाभ विसापूर येथील पाच स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून २ हजार २२५ लाभार्थ्यांना मिळणार आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या घरात दिवाळीच्या सणाचा गोडवा निर्माण झाला आहे.

.           सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणाली अंतर्गत अन्न नागरी पुरवठा विभागाच्या मार्फत केंद्र व राज्य सरकारने ‘ आनंदाचा शिधा ‘ उपक्रम सुरु केला आहे. शिधापत्रिकाधारकांच्या जीवनात दिवाळी सणाचा गोडवा निर्माण करून सन आनंदात साजरा व्हावा,म्हणून ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप केले जात आहे.केवळ १00 रुपये शुल्क आकारून चार ते पाच धान्य जिन्नस वाटप चालू आहे. याचा शुभारंभ विसापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार परमेश्वर पुणेकर यांच्या दुकानातून करण्यात आले.यावेळी विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम व ग्रामपंचायत सदस्य विद्या देवालकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात शिधापत्रिकाधारक भाऊराव उपरे,सारंग घोडाम,नामदेव साखरकर,नानाजी चौधरी,पुष्पा मून,सोनाबाई मेश्राम,सुमन मडावी,शांताबाई खनके,सुमित्रा कुमरे,विमल कोहचाडे आदिना ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप करण्यात आले.

.           विसापूर गावात एकूण पाच स्वस्त धान्य दुकान चालू आहे. या धान्य दुकानाच्या माध्यमातून जवळपास २ हजार २२५ शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेनुसार अन्नधान्य वितरण केले जाते.शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेने शिधापत्रिकाधारकांना मागील वर्षांपासून ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप करण्याचे धोरण सुरु केले आहे.या योजनेच्या माध्यमातून दिवाळी सणात केवळ १00 रुपये शुल्कात चार ते पाच अन्नधान्य जिन्नस वितरण करून गोडवा निर्माण केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.