पालकमंत्री मुनगंटीवार यांची देविदास ताजणे यांच्या घरी सदिच्छा भेट

40

वरोरा

.           कृषी संशोधन केंद्र एकार्जुना, कृषी विभाग व आत्मा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पिडीकेव्ही-इंडो काउंट सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर कॉटन” या प्रकल्पातंर्गत शेतकरी मेळावा, शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी एकार्जुना येथील देविदास ताजने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

.           आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता मोठी ग्राम पंचायत असलेल्या एकार्जुना येथील भाजपा कार्यकर्ते देविदास ताजने यांचे कडे राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी भेट घेत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक करिता. तयारी करण्याचे वैशाली देविदास ताजने यांना सुचविले आहे. या भेटी मध्ये गावातील सेवा सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी गावचे सरपंच, ग्राम विकास अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.