स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतीदिन कार्यक्रम संपन्न

34

भद्रावती 

.            तालुक्यात स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मौजा नंदोरी येथे . बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मूल्य साखळी विकास शाळा (VCDS) अंतर्गत सोयाबीन पीक शेतीशाळा “शेतीदिन कार्यक्रम” आयोजित करण्यात आला.

.            सोयाबीन शेती शाळेचे पाच वर्ग घेण्यात आले. या वर्गामध्ये सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणे, बीजप्रक्रिया करणे, बी बी एफ, पट्टा व बेडवर टोकन पद्धतीने लागवड मार्गदर्शन, तसेच सोयाबीन पीक परिसंस्था निरीक्षणे, चित्रीकरण व सादरीकरण व निष्कर्ष शेतकऱ्यांकडून करण्यात आले. शेतीशाळेत सोयाबीन पिकावर आढळणाऱ्या शत्रूकीड व मित्रकीड ओळख, किड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तन व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्याकरिता किडींचे नियंत्रण करण्याकरीता सापळा पिके, पक्षी थांबे, पिवळे व निळे चिकट सापळे, प्रकाश सापळे आणि कामगंध सापळे यांचा शेतात वापर करणे, निंबोळी व दशपर्णी अर्क तयार करणे तसेच जमिनीचा पोत सुधारण्याकरीता जीवामृत, घनजीवामृत, वेस्ट डी कंपोझर तयार करण्याबाबत वेळोवेळी तज्ञ प्रशिक्षक व प्रयोगशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

.            या शेती शाळेचा शेती दिन कार्यक्रम दि. ६ ला घेण्यात आला या शेतीदिन कार्यक्रम मध्ये शेतीशाळेच्या वर्गाचा मागोवा घेण्यात आला, सोयाबीन उद्योग संबंधित कंपन्या व शेतकरी संवाद, काढणी पश्चात तंत्रज्ञान व संवर्धित शेती, उत्पादन खर्च व परतावा यांचा ताळेबंद काढणे, प्रगतशील शेतकरी यांचे अनुभव आदान- प्रदान, शेतीपूरक व्यवसाय, सोयाबीन मूल्य साखळी, MCX, NCDEX या विषयावर बी. बलगमवार, मूल्य साखळी व पुरवठा साखळी तज्ञ, विभागीय प्रमुख अंमलबजावणी कक्ष नागपूर, . एच. एल. इद्दे, कृषि पर्यवेक्षक भद्रावती, सुधीर हिवसे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक भद्रावती, एस. ए. बोरकर, कृषी सहाय्यक, नंदोरी यांनी मार्गदर्शन केले. तर नंदोरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक नरेंद्र जिवतोडे यांनी सोयाबीन व हरभरा पिकाचा ताळेबंद काढून जास्त उत्पन्न वाढेल अशा पिकाची लागवड करणे बाबत मार्गदर्शन केले. संदीप एकरे, पांडुरंग आगलावे, अर्चना जिवतोडे, संदीप झाडे, महेश झाडे, प्रकाश निब्रड, सुनील उमरे यांनी शेतीशाळे बाबत अभिप्राय व्यक्त केले तसेच ते करीत असलेल्या शेती पद्धतीचे अनुभव कथन केले. सदर शेतीदिन कार्यक्रमाला अंबुजा फाउंडेशन चे प्रक्षेत्र अधिकारी राजु खंगार, आकाश दुरशेट्टीवार व नंदोरी, पळसगाव, विसलोन, पाटाळा, राळेगाव येथिल नंदोरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक व सभासद शेतकरी बंधू व भगिनी उपस्थित होते.