विसापुरातील वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

38
  • बल्लारशाह – गोंदिया रेल्वे रुळावरील घटना

चंद्रपूर

.           बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव असून तीन रेल्वे मार्गामुळे विभागले आहे.एक वृद्ध रेल्वे रुळ ओलांडून घराकडे जात होता.मात्र धडधड करत येणाऱ्या रेल्वेचा त्याला अंदाज आला नाही.रेल्वे गाडीची त्याला जबरदस्त धडक बसली.या धडकेत त्याचा अपघाती मृत्यू झाला.ही घटना आज शनिवार ४ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता दरम्यान विसापूर रेल्वे फटका जवळ घडली.मृतक वृद्ध शेतकऱ्याचे नाव वासुदेव तुकाराम कौरासे ( वय ७४ )रा.विसापूर ता.बल्लारपूर असे आहे.

.          वासुदेव कौरासे हे नेहमी सायंकाळ सुमारास टेकडी भागात गाई घराकडे आणण्यासाठी जात होते.त्याच प्रमाणे मुलीच्या नवीन घराच्या बांधकामाकडे देखील देखरेख करत होते.आजही ते नेहमीप्रमांणे रेल्वे रुळ ओलांडून घराकडे परत जात होते.त्याच वेळी बल्लारपूर कडून गोंदिया कडे सुपर फास्ट प्रवाशी रेल्वेने ध्यानिमनी नसताना जबरदस्त धडक दिली.या धडकेत ते घटनास्थळी गत प्राण झाले. गावातील तीन रेल्वे मार्गामुळे गावात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पायी ये – जा करणाऱ्यांना व रेल्वे गाडीचा अंदाज येत नाही.परिणामी नागरिकांना नाहक जीव गमवावा लागत आहे.रेल्वे लाईन वर पादचारि पूल तयार करण्याची मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.घटनेचा अधिक तपास विसापूर पोलीस चौकीचे कर्मचारी घनश्याम साखरकर व बल्लारशाह रेल्वेचे सहायक उपनिरक्षक पी.आय.लाडस्कर करत आहे.