वरोऱ्यातील रायडर चिकनकर दापत्यांची दुचाकीने 6 राज्यात भ्रमंती

63
  • 4 हजार 800 किलोमिटरचा पूर्ण केला प्रवास
  • शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जिवतोडे नी केला सत्कार

वरोरा 

.           येथील रॉयल रायडर क्लबच्या सदस्य असलेले चिकनकर दापत्यांनी स्वतःच्या दुचाकीने 4 हजार 800 किलोमीटरचा साहसी प्रवास करून 6 राज्यात भ्रमंती करत तेथील इतिहासिक,धार्मिक व नैसर्गिक ठिकाणी भेट देऊन देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन घेतले. त्यांच्या या साहसी भ्रमंतीबद्दल शिवसेना ( उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी चिकनकर दापत्यांनचा सत्कार केला.

.           जगातील प्रत्येक देशाला आपला असा इतिहास व संस्कृती असते. तसेच एकाच देशातील वेगवेगळ्या राज्यांनाही आपला इतिहास असतो आणि देशातील वा राज्यांमधील नागरिकांना आपल्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असतो. या इतिहासांशी निगडित प्राचीन वास्तू, राजवाडे, किल्ले, जलदुर्ग, स्मृतिस्थळे, धार्मिक स्थळे त्या देशांमध्ये व राज्यांमध्ये भग्नावस्थेत किंवा क्वचितच चांगल्या अवस्थेत अस्तित्वात असतात. या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला व राष्ट्राभिमान दाखवायला सर्वांनाच खूप आवडत असते. ऐतिहासिक वस्तू जतन करणाऱ्या संग्रहालयांना भेट देणे, हासुद्धा एक आवडता छंद असतो.

.           असाच काहीसा छंद जोपासत वरोरा शहरातील रॉयल रायडर क्लबचे सदस्य असलेले मनोज चिकनकर व त्यांच्या पत्नी मानसी चिकनकर यांनी वरोरा शहरातून आपल्या भ्रमंतीला सुरुवात करत नांदेड, अक्कलकोट, मालवण, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यात स्वतःच्या दुचाकीने प्रवास करत भ्रमंतीचा छंद जोपासला आहे. चिकनकर दापत्यांच्या साहसी भ्रमंतीचे वरोरा वासियांकडून कौतुक होत आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व त्यांची पत्नी रीमा जिवतोडे यांनी मनोज चिकनकर व मानसी चिकनकर यांचा सत्कार केला. यावेळी समस्त शिवसैनिक उपस्थित होते.