छठपूजेसाठी शिरणा नदीपात्रात तात्पुरता बंधारा बांधण्यात यावा

36

 शिवसेना (उबाठा) उपतालुका प्रमुख रवि भोगे यांची मागणी 

भद्रावती

.          तालुक्यातील माजरी परिसरात छ्ठपूजेसाठी शिरणा नदीपात्रात तात्पुरता बंधारा बांधण्यात यावा. अशी मागणी शिवसेना (उबाठा) भद्रावती उपतालुका प्रमुख रवि भोगे यांनी केली. शिवसेना (उबाठा) पक्षाचे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना (उबाठा) उपतालुका प्रमुख रवि भोगे यांनी सदर मागणी केली आहे. या मागणी संदर्भात रवि भोगे यांनी स्थानिक तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना काल दि. १ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर केले आहे.

.          तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी चर्चेअंती सदर मागणी संदर्भात पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याची तयारी दर्शविल्याची माहीती शिवसेना (उबाठा) उपतालुका प्रमुख रवि भोगे यांनी दिली. माजरी परिसरात फार मोठया संख्येत उत्तर भारतीय बंधू-भगिनी वास्तव्यात आहे. उत्तर भारतीय बंधू-भगिनी छठ पूजा उत्सव मोठ्या श्रध्देने साजरा करतात. सदर उत्सव दिवाळी सणानंतर साजरा करण्यात येतो. या उत्सवात महिला भगिनी नदीपात्रातील पाण्यात उभ्या राहून पूजा-अर्चा करतात. सध्या शिरणा नदीपात्र पूर्णतः कोरडे पडले आहे. नदीपात्रात मुबलक पाणी नसल्याने सदर सण साजरा करण्यास अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

.          येत्या दि. १५ नोव्हेंबर पुर्वी माजरी येथील शिरणा नदीपात्रात पाणी साठविण्या करीता तात्पुरता बंधारा बांधून छ्ठ पूजा सण उत्साहात साजरा करण्यास सहकार्य करावे. असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.