कर्नाटका एम्टा कामगारांच्या समस्या सोडवा : अन्यथा आंदोलन

37

पत्रपरिषदेत भाजपा शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांची माहिती

भद्रावती

.             कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड द्वारा संचालित एम्टा कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या विविध कंत्राटदार कंपनीतील कामगारांना शासन नियमानुसार पगार दिल्या जात नाही. कमी पगारात अधिक वेळ काम घेऊन आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन १५ दिवसात यावर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांनी पत्र परिषदेत दिला.

.             कंपनी स्थापनेपासून या ठिकाणी असलेल्या कामगारांचे शोषण सुरू आहे. या कंपनीत स्थानिकांना रोजगार न देता बाहेरील परप्रांतीयांना रोजगार देऊन काम केल्या जाते. शासनाच्या धोरणानुसार ८० % टक्के स्थानिकांना कामावर घ्या,सध्या कार्यरत कुशल-अकुशल कामगारांना कोल इंडियाच्या सन २०१३ नुसार हाय पॉवर कमिशनच्या वेजेस नुसार वेतन द्या, ८% टक्के भविष्य निर्वाह निधी कपात करून तो भरा,प्रत्येक कामगारांचा कंपनीने ५० लाखाचा अपघाती विमा काढावा, एलआयसी अंतर्गत कंपनी द्वारा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा काढावा, बरांज,कढोली, किलोनी, तांडा,मानोरा, कोंढा या गावातील ८०% टक्के शेत जमिनी कंपनीने घेतल्या आहे.त्या शेतजमिनीचे अवॉर्ड जाहीर करा . या मागण्यांशिवाय इतर मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्या १५ दिवसात पूर्ण न केल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भाजपाचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांनी पत्र परिषदेत दिला.

.             या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री यांचे सह इतरांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.पत्र परिषदेत भाजपा जिल्हासचिव सुनिल नामोजवार, नाना हजारे, रामा मत्ते, रवी डोंगे, राजू मत्ते यावेळी उपस्थित होते.