आकापुर टोला येथे शेतकरी पुत्र गणेश मंडळाच्या सौजन्याने रक्तदान शिबिर संपन्न

40
  •  २७ युवकांनी केले रक्तदान

नागभीड

.         तालुक्याच्या एका टोकावर वसलेल्या आकापुर टोला येथील श्री शेतकरी पुत्र गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

.         या रक्तदान शिबिराचे उद्घाटन या क्षेत्राचे माजी जि.प. सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी केले. याप्रसंगी तळोधी पो.स्टे. चे सहा.पोलिस निरिक्षक मंगेश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्त संकलन करण्यासाठी हेडगेवार रक्तपेढी, नागपुर यांच्या चमुने सहकार्य केले . यावेळी २७ रत्तदात्या युवकांनी रक्तदान केले. शिबिरात रक्तदानासाठी ५ महिलांनीही नोंदणी केली पण रक्तपेढी च्या टीमने नकार दिल्याने त्यांची इच्छा अपुरीच राहीली. पण महिलांच्या या साहसी पुढाकाराचे उपस्थित अतिथींनी चांगलेच कौतुक केले.

.         या शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र, टी शर्ट व नाश्ता देऊन अतिथिंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आकापुरचे सरपंच कुणाल गहाणे, पोलीस पाटील सुरेश सडमाके, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंताजी आलमवार, स्वप्नपूर्ती रक्तसेवा समिती सावरगावचे अध्यक्ष विकास बोरकर, माजी सरपंच नीता बोरकर, जि.प. प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक दमके, माजी ग्रा.पं.सदस्य व्यंकय्या भाकरे व मोरेश्वर निकुरे, सोशल मिडिया प्रमुख अंकित ठिकरे तसेच शेतकरी पुत्र गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य गण तसेच सर्व गावकरी मंडळी या रक्तदान शिबिराप्रसंगी उपस्थित होते.