ट्रॅक्टरची विद्युत खांबाला धडक

41

नेरी येथील घटना

नेरी

.        येथील जनता विद्यालयाच्या समोरील मार्गावर एका ट्रॅक्टर ने रस्त्याच्या बाजूला उभ्या विद्युत पोलला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की उभे पोल मध्यभागातून वाकले मात्र जीवितहानी टळली यावेळेस रस्त्यावर रहदारी नसल्याने व मार्गावर कुणीही नसल्याने सुदैवाने विपरीत घटना घडली नाही परंतु अनेक विद्युत कनेक्शन तुटल्याने वार्डातील बत्ती गुल झाली आहे.
.        नेरी येथील ट्रॅक्टर गावात आत मध्ये प्रवेश करीत असताना जनता विद्यालयाच्या जवळील समोरच्या मार्गावर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पोलला जोरधार धडक दिली यात पोल वाकले परंतु विपरीत घटना घडली नाही मात्र पोल वाकल्याने संपुर्ण वार्डाची व बाजार चौकातील बत्ती गुल झाली यामुळे नागरिक त्रस्त झाले असून सदर ट्रकटर वर महावितरण कुठली कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.