गणेश सजावटीतून प्रबोधनात्मक देखावा

377

शेतकरी मस्कऱ्या गणेश मंडळाने केली बळीराजा जीवन यात्रेवर सजावट

वरोरा

.          तालुक्यातील बोरगाव देशपांडे येथील शेतकरी मस्कऱ्या गणेश मंडळांनी बळीराजाच्या जीवन यात्रेवर गणेश सजावटी तुन प्रबोधनात्मक देखावा तयार करण्यात आला.

.          वरोरा तालुका हा ग्रामीण भागांना व्यापला आहे या भागात शेतकरी शेतमजुरांची संख्या जास्त प्रमाणात आहे, असताच शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा हे ब्रीद चालत होते, मात्र काही काळापूर्वी लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मरण यातना सोसावी लागत आहे.

.          याचाच एक नमुना म्हणून बोरगाव देशपांडे येथील शेतकरी मस्कऱ्या गणेश मंडळांनी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वन्य प्राण्यापासून होणारा त्रास, यलो मोझ्याक सारखे पीक नष्ट करणारे व्हायरस रोग, तसेच या सर्व संकटातून वाचलेल्या पिकांना हमीभाव मिळावा असे दृश्य त्यांनी सजवले.

.          तरी हा जरी जगाचा पोशिंदा असला तरी तो पाळीवप्राण्यासोबत एका कुटुंबासोबत म्हणून राहत असल्याचा देखावा हा त्यामधील एक वैशिष्ट्य ठरत आहे, शिंदे सरकारने जिल्हा परिषद शाळा ठेकेदारी देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचा विरोध म्हणून जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे आमचा गाव आमची शाळा आमची मुले शिकलीच पाहिजे हे एक त्यातील अप्रतिम दृश्य या गणेश मंडळांनी जी मूर्ती कुंभार दादाकडून बनवून घेतली.

.          ती म्हणजे खरा शेतकरी ही मूर्ती संपूर्ण शेतकऱ्याच्या वेशात आहे या गणेश मंडळांनी जो देखावा केला अधक्ष्य. समीर गजानन टोंगे, सदस्य श्रीकृष्ण देवतळे, आकाश धवने, प्रदीप ननावरे, रोशन देवतळे, प्रशांत देवतळे, संपूर्ण श्रेय मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सभासदांना जात आहे.