निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात गांधी जयंती साजरी

41

वरोरा

.            स्थानिक निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्या अनुषगांने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयोन परिसरात स्वच्छता मोहीम राबवून जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला. गांधी जयंतीच्या निमित्ताने मेरी माटी-मेरा देश’ अभियान राबवून विद्याथ्र्याना देशसेवेची शपथ घेतली.

.            कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गुरुदेव जुमडे यांनी गांधीजींचे विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहचवून ‘सत्य-अहिंमा-शांती या त्रीसुत्रीच जिवनात महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथी सचिव भद्रावती शिक्षण संस्था डॉ. कार्तिक शिंदे, यांनी स्वच्छतेचे धडे दिले व आरोग्यासाठी स्वच्छ परिसराचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रा.डॉ. प्रशांत पाठक, प्रा. विभुष लांडगे, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. रेश्मा नरडे, प्रा. सीम बोभाटे, प्रा. प्रणाली नरड,  तनुश्री बावणे व सर्व महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता ‘वैष्णव जन तो’ भजनाने झाली