वनमंत्र्याची मानवतेतून ‘ त्या ‘ वनशहीदाच्या कुटुंबाला मदतीसाठी धाव

37

पिडीत पत्नी व मुलांकडे केला २५ लाखांचा धनादेश सुपूर्द
वनशहीद सुधाकरच्या कुटुंबाचे केले आपुलकीने सांत्वन

बल्लारपूर
.          तालुक्यातील विसापूर येथील अतिशय गरीब कुटुंब.हलाकीचे जीवन जगत होते.अशातच तो वन विभागात शिपाई म्हणून रुजू झाला. शिपाईवरून तो चालक झाला.अनेक अधिकाऱ्यांचे त्यांनी सारथ्य केले. मात्र या सार्थ्यांचा रानटी हत्त्याच्या कळपाने शनिवार ( दि.१६ )सप्टेंबर रोजी बळी घेतला.त्याचे सुखी संसाराचे स्वप्न भंगले. पत्नी व दोन लहान मुलांचा आधारच काळाने हिरावला. आपल्याच कुटुंबातील माणसावर विपरीत परिस्थिती ओढवली. याच भावनेतून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘ त्या ‘ वनशहीदाच्या कुटुंबाला मदतीसाठी धाव घेतली.त्यांनी मानवतेतून आपुलकीने पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.त्या कुटुंबाला भविष्याची तरतूद म्हणून वन विभागाकडून २५ लाख रुपयाचा धनादेश पत्नी रीना सुधाकर आत्राम व दोन लहान मुलांकडे सुपूर्द केला.हा भावनिक प्रसंग विसापूरकरांनी सोमवारी रात्री ९.30 वाजता अनुभवला.
.          बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सुधाकर बापूराव आत्राम हा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ( देसाईगंज ) वन विभागात वाहन चालक म्हणून कार्यरत होता.आरमोरी वन परीक्षेत्रातील कक्ष ८५ मध्ये रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला होता. याची माहिती त्या भागातील नागरिकांनी आरमोरी वन विभागाला दिली.त्यावेळी वाहन चालक सुधाकर हा वन विभागाचे पथक घेवून आरमोरी वन परीक्षेत्रातील पळसगाव – डोंगरगाव परिसरात रानटी हत्त्यांना हुसकावून लावण्यासाठी गेला होता. मात्र वाहन चालक सुधाकर हा त्यावेळी एका रानटी हत्त्याच्या तावडीत सापडला.अन वनशहीद झाला.ही दुर्दैवी घटना शनिवार ( दि.१६ ) रोजी सायंकाळी ४.30 वाजता दरम्यान घडली.
.          त्याच दिवशी रात्री त्याचे पार्थिव देह विसापूर येथे आणण्यात आले. रविवार ( दि.१७ ) ला वनशहीद सुधाकर आत्राम याच्या पार्थिवांवर वडसा ( देसाईगंज ) येथील वन अधिकारी व गावाकऱ्यांच्या उपस्थित विसापूर येथील स्म्शानभूमीवर अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याची माहिती विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली.
.          पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय व्यस्त असताना सोमवार ( दि.१८ ) रोजी रात्री ९.30 वाजता विसापूर येथे आले. त्यांनी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य वनशहीद झाल्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली.सुधाकर ची पत्नी रीना व त्याच्या दोन मुलांची आस्थेने व आपुलकीने विचारपूस केली.पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.२५ लाख रुपयाचा धनादेश दिला.भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना पिडीत कुटुंबाला कोणतीही अडचण येऊ देऊ नका, म्हणून निर्देश दिले.यावेळी विसापूरकरांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आपुलकीच्या माणसासाठी माणुसकी दाखवून वन विभागाकडून मदत दिल्याबद्दल मानवता कायम असल्याचा अनुभव आला.
.          यावेळी गडचिरोली येथील भारतीय वन सेवेतील अधिकारी रमेश कुमार,वडसा ( देसाईगंज ) वन विभागातील अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चौव्हाण, आरमोरी वन परीक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम,बल्लारपूर तालुका भाजपा अध्यक्ष किशोर पंदिलवार,राज्य भाजपा चिटणीस विद्या देवाळकर, विसापूरच्या सरपंच वर्षा कुलमेथे,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,बल्लारपूरच्या तहसीलदार डा.कांचन जगताप,बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व वन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वनशहीद सुधाकरच्या मुलाला मिळणार नोकरी                                                                                                                                                          रानटी हत्तीच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वन विभागातील वाहन चालक सुधाकर आत्राम यांना दोन मुले आहेत. वन विभागातील नवीन शासन निर्णयामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्याना २५ लाख रुपये मदत दिली जात होती. वन विभागाने ती दिली.मात्र वन कर्मचाऱ्यांना वन्य प्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीला शहीद दर्जा दिल्यामुळे पुन्हा एकदा महिनाभरात दुसरा २५ लाख रुपयाचा धनादेश दिला जाणार असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.पिडीत सुधाकरच्या एका मुलाला वन विभागात वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर व दहावी उत्तीर्ण झाल्यावर वन विभागात वनरक्षक म्हनुन नोकरी दिली जाणार आहे.