अन्नत्याग आंदोलनाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

34

चंद्रपूर
.            राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादावरून आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. जालन्यात मनोज जरांगे यांचे मराठा समजाच्या मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे तर जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे अशी मागणी केली ही चुकीची आहे. त्या मागणीचा राज्यातील ओबीसी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तर मराठा समाजाच्या मागणीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर च्या परिसरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे हे 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे. सोमवारी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग नोंदवला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर सह सर्व पक्षीय नेते एकवटत हजेरी लावली होती .

.            मराठा समाजाच्या मागणीविरोधात राज्यभरात व चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे हे 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे, आज आठवडा लोटल्यावर राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली मुनगंटीवार यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करीत बैठक लावू असे आश्वासन आंदोलकांना दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, वस्तीगृहाबाबत चंद्रपुरात वसतिगृह सूरु करू व स्वाधार योजनेचा लाभ इतर ओबीसी विद्यार्थ्यांना देणार असे आश्वस्त केले मात्र आंदोलकांनी मुनगंटीवार यांना हा प्रश्न जिल्ह्याचा नसून राज्याचा आहे, वस्तीगृह चंद्रपूर सहित राज्यात सुरू करावे असे आंदोलकांनी म्हटले सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आंदोलकांसोबत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधून दिला.