भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू

42
  • लघुशंकेला गेल्याने पतीचा जीव वाचला 
  • चिमुर तालुक्यातील घटना 

नेरी

मागील तीन दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसाने घरात झोपेत असलेल्या महिलेच्या अंगावर भिंत कोसळली यात महिलेचा मृत्यू झाला . तर लघुशंकेसाठी पती घराबाहेर आल्याने सुदैवाने पतीचे प्राण वाचले . सदर घटना चिमुर तालुक्यातील डोमा येथे शनिवारी दिनांक ९ सप्टेंबरला रात्रो ११.३० वाजताच्या सुमारास घडली . शेवंताबाई रघुजी शेंडे (७०) असे मृतक वृद्ध महिलेचे नाव आहे .

प्राप्त माहितीनुसार चिमुर तालुक्यात तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे . शनिवारी रात्री जोरदार पाऊस सुरू झाला . डोमा येथील शेवंताबाई रघुजी शेंडे व त्यांचे पती रघुजी देवाजी शेंडे (७५) हे घरी झोपले असताना अचानक घराची भिंत कोसळली. . त्याच दरम्यान अगदी १० मिनिटा अगोदर पती रघुजी यांना जाग आली आणि ते लघु शंके साठी घरा बाहेर आले . आणि अति पावसामुळे घराची भिंत कोसळली व पत्नी शेवंता बाई हिच्या अंगावर भिंतीचा काही भाग कोसळल्यामुळे गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्वरित पतीने तिला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालय येथे रेफर केले त्यानंतर तिला चंद्रपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईकांनी त्वरित वापस येऊन मृतदेह डोमा येथे आणला व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली त्यानुसार शंकरपूर पोलिसांनी चौकशी करून व पंचनामा करून मर्ग दाखल करून घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली

शेवंताबाईच्या आकस्मित मृत्युने डोमा गावात हळूहळू व्यक्त होत आहे . मृतकाच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी डोमा व परिसरातील नागरिकांनी केली आहे