स्वच्छता दूतांचा सत्कार करून ८५ वर्षाच्या आईचा अनोखा वाढदिवस

37
  •  भगवती गुलाबचंद छत्रवाणी यांचा ८५ वा वाढदिवस साजरा.

सिंदेवाही :- “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” “आई” या व्यक्तीचे स्थान आज कोणीच घेऊ शकत नाही . आपल्या आयुष्याची सुरुवातच आईपासून होते. आपल्यावर निस्वर्थपणे प्रेम करणारी ती पहिली, आणि शेवटची व्यक्ती म्हणजे “आई” आहे. अशाच एका ८५ वर्षाच्या आईचा अनोखा वाढदिवस साजरा केला तो सिंदेवाहितील प्रसिद्ध व्यक्ती बलराम छत्रवानी यांनी.

बलराम जी यांची आई श्रीमती भगवती गुलाबचंद छत्रवाणी यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील स्वच्छतेची सेवा देणारे ५५ स्वच्छतादूत यांची दखल घेत त्यांचा अथोचीत सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंदेवाही नगरपंचायत सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक, सुपरवायझर, महिला सफाई कर्मचारी, तसेच निस्वार्थ स्वतः सेवा देणारे बावणे पिता पुत्र, आणि नगर पंचायत उपाध्यक्ष मयूर सूचक, नगरसेवक युनूस शेख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन छत्रवानी परिवाराच्या वतीने या सर्वांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह,आणि गुलाबपुष्प देऊन आदरातिथ्य सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम ताल्लेवार सभागृहात पार पडला असून यावेळी सिंधी समाजातील कुटुंब, बलराम छत्रवानी, गोल्डी बीसेन, युनूस शेख, जहिद पठाण, चांद शेख, संदीप बांगडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युनूस शेख, तर संदीप बांगडे यांनी कार्यक्रमाचे महत्व काय? याबाबत सांगितले. नंतर शहरातील प्रसिद्ध हॉटेल शंतिभूवन येथे स्वरूची भोजनाचा आयोजन करून समरोप करण्यात आला. आईचा ८५ वा अनोखा वाढदिवस साजरा केल्याने शहरातील अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आहे.