हिरालाल लोया कनिष्ठ महाविदयालयात “शिक्षक दिन ” साजरा

81

वरोरा

शिक्षकदिनानिमित्य स्वयंशासन कार्यक्रम हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात एकूण ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वयंशासन कार्यक्रमानंतर विद्यार्थी शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहामध्ये एकत्र बोलावून त्यांच्या या कार्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला.

या शिक्षक दिन सोहळयाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत जोशी यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया यांनी आपले स्थान भूषविले तसेच उपप्राचार्य पवार यांनी ही आपली उपस्थिती दर्शविली. प्रमुख पाहूणे म्हणून आलेले कृष्णकांत लोया यांनी विद्यार्थ्यांना गुरू महिमा विषयी मार्गदर्शन केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशी यांनी आपल्या भाषणामध्ये स्वयंशासन कार्यक्रमाबध्दल विद्यार्थ्यांचे कौतूक केले व शिक्षक विद्यार्थ्यामधील ऋणानुबंध आयुष्याला कसे मार्गदर्शक ठरतात या बद्दल सांगीतले.

या कार्यक्रमात स्वयंशासन कार्यक्रमाचे उत्कृष्ठ विदयार्थी शिक्षक म्हणून वैष्णवी दातारकर, श्रेया पिसे ,प्रिया दमाहे, सानिया तुरानकर श्रुतीका खोडके, श्रुती बुराण यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता देवतळे, बारेकर ,वरारकर, जांभुळे ,अस्वले तसेच इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका वर्ग यांचेही सहकार्य लाभले. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुध्दा या कार्यक्रमासाठी आपले सहकार्य दिले या कार्यक्रमासाठी आपले सहकार्य दिव्ये या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शर्वरी खामनकर व आभार प्रदर्शन गायत्री आंबुलकर यांनी केले व