रानडुकराच्या हल्लात जखमी झालेल्या व्यक्तीस वनविकास महामंडळाकडुन मदत

39

नागभीड

.           तालुक्यातील देवपायली येथील प्रमोद लक्ष्मण कोहपरे हे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाले होते . वनविकास महामंडळाकडुन मिळालेल्या मदतीचा धनादेश जि.प.चे माजी सदस्य व भाजपा चंद्रपुर जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते जखमी प्रमोद कोहपरे यांना देण्यात आला केला.

.           मेंडकी येथील वनविकास महामंडळाच्या रोपवाटीकेत रोजंदारी ने मजुरी करणाऱ्या प्रमोद कोहपरे यांच्यावर जानेवारी महिन्यात रोपवाटीकेतच काम करीत असतांना रानडुकराने हल्ला केल्याने जबर जखमी झाले होते. ब्रम्हपुरी येथे त्यांना तातडीने भरती केल्याने उपचारानंतर त्यांचे प्राण वाचले पण त्यांना कायमचे अंपगत्व आले. उपचाराकरीता आलेल्या खर्चासाठी त्यांना स्वकीयांनी त्यावेळी मदत केली.

.           यासंदर्भात वनविकास महामंडळाकडे पाठपुरावा करुन संजय गजपुरे यांनी राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन १ लक्ष २५ हजार रु. ची आर्थिक मदत मिळवून दिली. त्यांना आता शारिरीक मेहनतीचे काम करणे शक्य नसल्याने दिव्यांग योजनेतून यापुढे स्वयंरोजगारासाठी सहकार्य करण्याचे कबुल केले. वनविकास महामंडळाकडुन प्राप्त झालेला धनादेश देवपायली येथे प्रमोद लक्ष्मण कोहपरे यांच्या निवासस्थानी संजय गजपुरे यांनी सुपुर्द केला त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी कठीण परिस्थितीत शासनाची मदत मिळवून दिल्याबद्दल आभार मानले.
यावेळी देवपायली चे सरपंच अरविंद कोहपरे, माजी सरपंच अर्चना ठाकरे, ग्रा.पं. सदस्य मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर, ज्योती मडावी, पोलीस पाटील संदिप नवघडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्रीहरी मडावी, बोंड ग्रा.पं. चे उपसरपंच जगदिश पाटील राऊत व सदस्य अशोक कोहपरे, आकापुर ग्रा.पं. च्या माजी सरपंच निता बोरकर, देवपायली भाजप चे बुथ अध्यक्ष व ज्येष्ठ नेते राजेश्वर गुरपुडे, माजी सरपंच लक्ष्मण कोहपरे, भाजपाचे दयाराम खेवले, सुनिल नवघडे, शांताराम मडावी, दिलिप भोयर, मोरेश्वर निकुरे व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.